Voter Issues : मविआ अन् मनसेच्या शिष्टमंडळाचं निवडणूक आयोगाला 9 मुद्द्यांचं पत्र, ‘त्या’ 4 पानात नेमकं काय म्हटलंय?
महाविकास आघाडी आणि मनसेच्या शिष्टमंडळाने दिल्लीत केंद्रीय निवडणूक आयोगाला चार पानी पत्र सुपूर्द केले. यामध्ये नऊ प्रमुख मुद्दे मांडण्यात आले असून, राज्यातील निवडणूक आयोगाकडून समाधानकारक प्रतिसाद न मिळाल्याने केंद्रीय हस्तक्षेपाची मागणी करण्यात आली आहे. पत्रात बनावट मतदारांच्या मुद्द्यावरही भर देण्यात आला आहे.
महाविकास आघाडी (MVA) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS) शिष्टमंडळाने दिल्ली येथे केंद्रीय निवडणूक आयोगाला चार पानी पत्र सादर केले आहे. या पत्रात नऊ महत्त्वाचे मुद्दे मांडण्यात आले असून, ते मुख्य निवडणूक आयुक्तांना देण्यात आले आहे. या पत्रावर महाराष्ट्रातील प्रमुख विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. यामध्ये राज ठाकरे, उद्धव ठाकरे, शरद पवार, जयंत पाटील आणि हर्षवर्धन सपकाळ यांचा समावेश आहे.
या शिष्टमंडळाने यापूर्वी १४ आणि १५ ऑक्टोबर रोजी राज्यातील निवडणूक आयोगाची भेट घेतली होती. मात्र, त्या भेटीनंतर त्यांना कुठल्याही प्रकारचे समाधान मिळाले नसल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे. त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाने या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची मागणी त्यांनी केली आहे. राज्यातील निवडणूक आयोगाने यापूर्वी त्यांचे आरोप फेटाळले असल्याने, आता केंद्रीय आयोगाच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.
