Bachchu Kadu Protest : 6 वाजेपर्यंत आंदोलनस्थळ सोडा… नागपूर खंडपीठाचे आदेशानंतर बच्चू कडूंची भूमिका काय?

Bachchu Kadu Protest : 6 वाजेपर्यंत आंदोलनस्थळ सोडा… नागपूर खंडपीठाचे आदेशानंतर बच्चू कडूंची भूमिका काय?

Harshada Shinkar | Updated on: Oct 29, 2025 | 5:31 PM

कर्जमाफीच्या मागणीसाठी बच्चू कडूंनी सुरू केलेल्या आंदोलनाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने 6 वाजेपर्यंत आंदोलनस्थळ रिकामे करण्याचे आदेश दिले आहेत. शाळा, रुग्णालये आणि महामार्गांवर परिणाम होत असल्याने न्यायालयाने स्वतः दखल घेतली. बच्चू कडूंच्या मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन मागे न घेण्याच्या भूमिकेनंतरही कोर्टाचा हा महत्त्वाचा आदेश आहे.

नागपूर खंडपीठाने बच्चू कडू यांना सायंकाळी 6 वाजेपर्यंत आंदोलनस्थळ सोडण्याचे आदेश दिले आहेत. कर्जमाफीच्या मागणीसाठी बच्चू कडूंचे आंदोलन कालपासून सुरू आहे. मात्र, यामुळे परिसरातील शाळा, रुग्णालये आणि चार महामार्ग ठप्प झाल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सुओ मोटो याचिका दाखल करून घेतली.

न्यायालयाने परिस्थितीची गांभीर्याने दखल घेत, आज सायंकाळी 6 वाजेपर्यंत आंदोलनस्थळ मोकळे करण्याचे निर्देश दिले आहेत. उद्या सकाळी 11 वाजता नागपूरचे पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांना हायकोर्टात याबाबतची माहिती सादर करायची आहे. याआधी बच्चू कडू यांनी मागण्या पूर्ण झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिका घेतली होती. आता सरकारी प्रतिनिधी म्हणून दोन राज्यमंत्री चर्चेसाठी दाखल होत असतानाच, न्यायालयाचा हा महत्त्वाचा आदेश आला आहे.

Published on: Oct 29, 2025 5:30 PM
Follow Us