Special Report | राणेंच्या ‘त्या’ विधानाचा शिंदेकडून समाचार !

Special Report | राणेंच्या ‘त्या’ विधानाचा शिंदेकडून समाचार !

| Edited By: | Updated on: Aug 22, 2021 | 10:06 PM

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राज्याचे नगरविकास मंत्री यांच्या विषयी खळबळजनक वक्तव्य केलं. शिंदे यांना भाजपात घेऊ ते शिवसेनेला कंटाळले आहेत, असं नारायण राणे म्हणाले. त्यांच्या या विधानाने विविध राजकीय चर्चांना उधाण आलं.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी खळबळजनक वक्तव्य केलं. शिंदे यांना भाजपात घेऊ ते शिवसेनेला कंटाळले आहेत, असं नारायण राणे म्हणाले. त्यांच्या या विधानाने विविध राजकीय चर्चांना उधाण आलं. अखेर एकनाथ शिंदे यांनी राणेंच्या दाव्याला खणखणीत उत्तर दिलं. मला मंत्री म्हणून काम करण्याचं पू्र्ण स्वातंत्र्य आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे माझ्या कोणत्याही कामात हस्तक्षेप करत नाहीत. याउलट ते आपण सुचविलेल्या सुचनांची अंमलबजावणी करतात, अशी भूमिका शिंदे यांनी मांडली.

Published on: Aug 22, 2021 10:05 PM