VIDEO : Narayan Rane Live | नारायण राणेंना पोलिसांनी ताब्यात घेतलं-सूत्र

VIDEO : Narayan Rane Live | नारायण राणेंना पोलिसांनी ताब्यात घेतलं-सूत्र

| Edited By: | Updated on: Aug 24, 2021 | 3:33 PM

केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना अखेर अटक करण्यात आली आहे. नारायण राणेंविरुद्ध नाशिक, पुणे, रायगड अशा विविध ठिकाणी गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर नाशिक आणि पुणे पोलिसांनी कोकणात पथकं पाठवली होती.

केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना अखेर अटक करण्यात आली आहे. नारायण राणे यांच्या विरोधामध्ये नाशिक, पुणे, रायगड अशा विविध ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आली होती. त्यानंतर आता अखेर पोलिसांनी रत्नागिरीतील संगमेश्वर येथून नारायण राणे यांना अटक केली. त्याआधी नारायण राणे यांनी मुंबई हायकोर्टात जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र न्यायालयाने तातडीने सुनावणी करण्यास नकार देत जामीन अर्ज फेटाळल्या होता. मी तिथे असतो तर कानाखाली लगावली असती, असा शब्दांत नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर प्रहार केला होता. शिवसेना नेते सुधाकर बडगुजर यांनी नाशिक पोलिसांकडे यासंदर्भात तक्रार केली होती. नाशिक पोलिसांच्या सायबर सेलने नारायण राणे यांच्यावर गुन्हा दाखल केला होता.

Published on: Aug 24, 2021 03:29 PM