Mock Drill : दादारमधील डिसिल्वा शाळेत सायरन वाजले, नागपूरमध्येही मॉक ड्रिलची तयारी
उद्या देशभरात मॉक ड्रिल घेण्याचे आदेश केंद्रीय गृह मंत्रालयानं दिले आहेत. त्याची तयारी राज्यात सुरू झाली आहे.
दादरमध्ये डिसील्वा शाळेत आज सकाळी 9 वाजता सायरन वाजवण्यात आले. सायरन वाजवून त्याबाबत तपासणी देखील करण्यात आली. तर दुसरीकडे नागपूरच्या शाळेत देखील मॉक ड्रिलच्या तयारीची पाहणी करण्यात आली.
भारताकडून पाकिस्तानविरोधात कठोर कारवाई करण्याची शक्यता आहे. भारताच्या हल्ल्याला पाकिस्तानकडून प्रत्युत्तर मिळू शकतं. त्यामुळे भारतानंही तयारी सुरु केली आहे. शहरांवर हल्ला झाल्यास नागरिकांना त्यांचा जीव वाचवता यावा यासाठी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी उद्या देशभरात मॉक ड्रिल घेण्याचे आदेश केंद्रीय गृह मंत्रालयानं दिले आहेत. त्याची तयारी राज्यात सुरू झाली आहे.
Published on: May 06, 2025 06:00 PM
