Sameer Wankhede | नवाब मलिकांचे आरोप, समीर वानखेडेंचं उत्तर ; सूत्रांच्या माहितीनूसार

| Updated on: Nov 07, 2021 | 5:07 PM

अल्पसंख्याक विकास कॅबिनेट मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांच्याविरोधात एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्या वडिलांनी मानहानीचा दावा ठोकला आहे.

Follow us on

अल्पसंख्याक विकास कॅबिनेट मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांच्याविरोधात एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्या वडिलांनी मानहानीचा दावा ठोकला आहे. ज्ञानदेव वानखेडे यांनी मलिक यांच्याविरोधात 1.25 कोटी रुपयांचा दावा दाखल केला आहे. नवाब मलिक यांनी ट्विटरवरुन एकामागून एक गौप्यस्फोट करण्याचा धडाका सुरुच ठेवला आहे. समीर वानखेडे आणि त्यांच्या वडिलांच्या जात प्रमाणपत्रावर त्यांनी संशय व्यक्त केला होता. या प्रकरणी ज्ञानदेव वानखेडे यांनी बॉम्बे हायकोर्टात धाव घेत अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला आहे. प्रसारमाध्यम, सोशल मीडियामध्ये आपल्या कुटुंबियांबद्दल प्रसारित होणाऱ्या वृत्तांवर बंदी यावी, यासाठी ज्ञानदेव वानखेडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली आहे. अर्शद शेख हे त्यांचे वकील आहेत. सोमवारी याबाबत कोर्टात सुनावणी होणार आहे.