NCB कडून अभिनेत्री अनन्या पांडेची चौकशी होणार

NCB कडून अभिनेत्री अनन्या पांडेची चौकशी होणार

| Edited By: | Updated on: Oct 22, 2021 | 12:06 PM

बॉलिवूड अभिनेता चंकी पांडे याची मुलगी अनन्या पांडे हिची काल एनसीबीकडून जवळपास सव्वा दोन तास चौकशी करण्यात आली. विशेष म्हणजे मुंबई एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी स्वत: एका महिला अधिकाऱ्यासोबत अनन्याची चौकशी केली

मुंबई : बॉलिवूड अभिनेता चंकी पांडे याची मुलगी अनन्या पांडे हिची काल एनसीबीकडून जवळपास सव्वा दोन तास चौकशी करण्यात आली. विशेष म्हणजे मुंबई एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी स्वत: एका महिला अधिकाऱ्यासोबत अनन्याची चौकशी केली, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. पण अनन्याच्या काल झालेल्या चौकशीत पुरेशी माहिती मिळालेली नाही. त्यामुळे तिला आज पुन्हा सकाळी अकरा वाजता एनसीबी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचं समन्स बजावण्यात आलं आहे.