Monsoon session : विधानभवन परिसरात आव्हाडांनी शिरसाटांचा हात ओढला अन्… पुढे काय झालं? बघा तुम्हीच
राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचे काही दिवस शिल्लक असताना काही राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी, हालचाली चांगल्याच लक्ष वेधून घेतात. अशातच आज जितेंद्र आव्हाज आणि शिरसाट यांच्यात भेट चर्चेत आली आहे.
सध्या राज्याचं राज्य विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे. अशातच विधानभवन परिसरात जितेंद्र आव्हाड (राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार गट) आणि संजय शिरसाट (शिवसेना – शिंदे गट) यांची भेट झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी संजय शिरसाट आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात काहीसा संवाद झाला. जितेंद्र आव्हाड यांनी शिरसाटांसमोर हात जोडत चर्चा केली. हे दोघेही महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्त्वाचे नेते आहेत आणि ते अनेकदा विधानमंडळाच्या अधिवेशनांदरम्यान किंवा इतर सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये एकमेकांना भेटत असतात. त्यांच्यातील भेटीगाठींवर माध्यमांचे लक्ष नेहमीच असते, कारण त्यांची राजकीय भूमिका एकमेकांच्या विरोधात असली तरी, वैयक्तिक संबंधात सौहार्द दिसून येतो. बघा आज नेमकं काय घडलं?
Published on: Jul 11, 2025 05:17 PM
