Jitendra Awhad : ‘हा’ मेसेज वाचून जितेंद्र आव्हाडांच्या पाया खालची जमीन सरकली, मुख्यमंत्र्यांना विनंती करणारं नवं ट्वीट काय?

Jitendra Awhad : ‘हा’ मेसेज वाचून जितेंद्र आव्हाडांच्या पाया खालची जमीन सरकली, मुख्यमंत्र्यांना विनंती करणारं नवं ट्वीट काय?

| Updated on: Jul 24, 2025 | 2:02 PM

सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील तांदुळवाडी या गावचा रहिवासी असलेल्या कंत्राटदार हर्षल पाटील यांनी नुकतीच आत्महत्या केली. यानंतर सरकारवर टीका होतेय. अशातच एका दुसऱ्या कंत्राटदाराने जितेंद्र आव्हाडांना एक मेसेज केलाय. हा मेसेज शेअर करून आव्हाडांनीमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली आहे.

आणखी एका कंत्राटदाराने शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना मेसेज केलाय. ‘आपली ही पोस्ट बघितली आणि पुढचा नंबर माझाच असेल का असं वाटतंय.’, असा या मेसेजमध्ये उल्लेख आहे. तर कंत्राटदाराचा मेसेजचा स्क्रिन शॉट ट्वीट करत हा मेसेज वाचून पायाखालची जमीन सरकरली असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे. इतकंच नाहीतर कंत्राटदाराला धीर देत जितेंद्र आव्हाड यांनी असेही म्हटले की, अरे बाबा टेन्शन नको घेऊ.. आई-वडील लेकरं बाळांकडे बघ.. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून सांगलीच्या कंत्राटदार हर्षल पाटील यांना श्रद्धांजली वाहिली आहे. मात्र, त्यावर आणखी एका कंत्राटदार तरुणाची प्रतिक्रिया समोर आली आहे. ही प्रतिक्रिया वाचून जितेंद्र आव्हाड यांच्या पायाखालची जमीन घसरली असे त्यांनी म्हटलंय. कारण, त्यात कंत्राटदारानं असं म्हटलंय की “कदाचित हर्षलनंतर पुढचा नंबर माझाच असेल”.

Published on: Jul 24, 2025 02:01 PM