Santosh Deshmukh Case : D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? बीडमध्ये बॉस कुणाला म्हणतात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
गेले चार दिवस हिवाळी अधिवेशनात विरोधकांनी मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी चांगलाच आवाज उठवला आहे. यामध्ये शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी देखील भाषण करत सभागृह स्तब्ध केल्याचे पाहायला मिळाले.
राज्यात विधानसभेचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे. आज हिवाळी अधिवेशनाचा पाचवा दिवस आहे. मात्र गेले चार दिवस हिवाळी अधिवेशनात विरोधकांनी मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी चांगलाच आवाज उठवला आहे. यामध्ये शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी देखील भाषण करत सभागृह स्तब्ध केल्याचे पाहायला मिळाले. मात्र दोन दिवस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून कोणतंच उत्तर मिळालेलं नाहीये. अशातच डी फॉर डॉन, बीडमध्ये बॉस कोणाला म्हणतात? असा सवाल शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला आहे. बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी जितेंद्र आव्हाड चांगलेच आक्रमक झाले आहेत. जितेंद्र आव्हाड म्हणाले, ‘मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचं हत्याप्रकरण हा मोठा विषय आहे. यावर उत्तर मिळणं अपेक्षित आहे. अशा विषयात संसदीय प्रणालीत मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द हा अंतिम मानला जातो पण आज उत्तर मिळणं अपेक्षित आहे.’, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. पुढे जितेंद्र आव्हाड असेही म्हणाले, खंडणी प्रकरणाच्या वादातूनच संतोष देशमुख यांचा खून झालाय. ही खंडणी नाही तर दोन महिन्यापूर्वी आवादा कंपनीतून इलेक्शन फंड मागितला होता. त्यामुळे एकाची चौकशी करून काही होणार नाही. सिरीअल किलर आहेत या प्रकरणातील सर्व आरोपी… हे सर्व पोलीस आणि राजकीय वर्तुळातील बडे नेते मिळून हे सगळं करतात, असा आरोप जितेंद्र आव्हाडांनी केला.
