Nagpur मधील गंगा जमुनेतील रेड लाईट एरियाचा संघर्ष चांगलाच पेटला

| Updated on: Aug 22, 2021 | 7:51 PM

नागपुरातील गंगा जमुना ही वारांगणांची वस्ती काही दिवसांपूर्वी पोलिसांनी सील केली. त्यानंतर संघर्ष वाढायला लागला. 15 ऑगस्टच्या दिवशी या वस्तीत लावलेले बॅरिकेट राष्ट्रवादीच्या ज्वाला धोटे यांनी तोडले. मात्र ते पोलिसांनी पुन्हा लावून घेतले. आज रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर  धोटे या वस्तीत पोहचल्या आणि त्यांनी वारांगणांकडून राखी बांधून घेत पुन्हा एकदा बॅरिकेट तोडायला सुरवात केली. 

Follow us on

नागपूर : शहराच्या मध्यभागी असलेल्या गंगा जमुना या रेड लाईट एरियाचा संघर्ष आता चांगलाच पेटला आहे. एकीकडे रेड लाईट एरिया वाचविण्यासाठी राष्ट्रवादीच्या ज्वाला धोटे वारांगणांना सोबत घेऊ संघर्ष करत आहेत. तर दुसरीकडे पोलिसांच्या मदतीला वस्तीतील नागरिक आणि गंगा जमुना हटाव संघर्ष समिती सामोरासमोर आली आहे. नागपुरातील गंगा जमुना ही वारांगणांची वस्ती काही दिवसांपूर्वी पोलिसांनी सील केली. त्यानंतर संघर्ष वाढायला लागला. 15 ऑगस्टच्या दिवशी या वस्तीत लावलेले बॅरिकेट राष्ट्रवादीच्या ज्वाला धोटे यांनी तोडले. मात्र ते पोलिसांनी पुन्हा लावून घेतले. आज रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर  धोटे या वस्तीत पोहचल्या आणि त्यांनी वारांगणांकडून राखी बांधून घेत पुन्हा एकदा बॅरिकेट तोडायला सुरवात केली.  पोलिसांचा बंदोबस्त असतानासुद्धा त्यांनी बॅरिकेट काढले.  मात्र गंगा जमुना हटाव समितीचे कार्यकर्ते समोरून आले आणि त्यांनी विरोध केला. वारांगणांचे पुनर्वसन होत नाही तोपर्यंत या ठिकाणी यांना बंद करून ठेऊ देणार नाही, त्यासाठी संघर्ष करणार असल्याचं ज्वाला धोटे यांनी सांगितलं.