Rohini Khadse : रोहिणी खडसेंचं रक्षा खडसेंना समर्थन? NCP चा उमेदवार नसताना मतदानाच्या दिवशी पोलिसांसोबत बाचाबाची, बघा VIDEO

Rohini Khadse : रोहिणी खडसेंचं रक्षा खडसेंना समर्थन? NCP चा उमेदवार नसताना मतदानाच्या दिवशी पोलिसांसोबत बाचाबाची, बघा VIDEO

Updated on: Dec 04, 2025 | 4:15 PM

मुक्ताईनगर येथे मतदानादरम्यान रोहिणी खडसे पोलिसांसोबत बाचाबाची करतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. राष्ट्रवादीचा एकही उमेदवार नसतानाही, रोहिणी खडसे रक्षा खडसेंच्या समर्थनार्थ मैदानात उतरल्याची चर्चा आहे.

मुक्ताईनगर येथे मतदानादरम्यान रोहिणी खडसे पोलिसांसोबत बाचाबाची करतानाचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत हा प्रकार घडला असून, पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा मुक्ताईनगरमध्ये एकही उमेदवार नसताना रोहिणी खडसे यांचा पोलिसांसोबत वाद झाल्याचे समोर आले आहे. रक्षा खडसे यांच्या समर्थनार्थ रोहिणी खडसे मैदानात उतरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राजकीय वातावरणात अनेक चर्चांना उधाण आले आहे.

जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथील मतदान केंद्राबाहेर मतदानाच्या दिवशी चांगलाच राडा पाहायला मिळाला. विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते समोरासमोर आल्याने एकच गोंधळ निर्माण झाला होता. अशातच आमदार चंद्रकांत पाटील आणि खडसे यांचे कार्यकर्ते आमनेसामने आल्याचे पाहायला मिळाले.

Published on: Dec 04, 2025 04:15 PM