NCP | राष्ट्रवादीत इनसाईड स्टोरी! फडणवीस-तटकरे भेटीची सुनेत्रा पवारांना कल्पनाच नव्हती? राष्ट्रवादीत नेमकं काय घडतंय?

NCP | राष्ट्रवादीत इनसाईड स्टोरी! फडणवीस-तटकरे भेटीची सुनेत्रा पवारांना कल्पनाच नव्हती? राष्ट्रवादीत नेमकं काय घडतंय?

| Updated on: Jul 16, 2026 | 10:12 AM

राष्ट्रवादी काँग्रेसमधील राजकीय घडामोडींना वेग आला असून, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतलेल्या भेटीबाबत नवे तपशील समोर येत आहेत. या भेटीची माहिती उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांना आधीपासून नव्हती, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, 14 तारखेला प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मात्र, या बैठकीबाबत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना पूर्वकल्पना नव्हती. तसेच पार्थ पवार यांनाही या भेटीची माहिती देण्यात आली नव्हती, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

दरम्यान, भेटीनंतर सुनील तटकरे यांनी स्वतः सुनेत्रा पवार यांच्याशी संपर्क साधत या बैठकीमागील कारण स्पष्ट केल्याची माहितीही सूत्रांकडून समोर आली आहे.

याच पार्श्वभूमीवर काल देवगिरी शासकीय निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीत सुनेत्रा पवार, सुनील तटकरे, हसन मुश्रीफ आणि छगन भुजबळ यांच्यात विविध राजकीय मुद्द्यांवर चर्चा झाली. यावेळी तटकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भेटीमागील भूमिका आणि कारणे सुनेत्रा पवार यांना स्पष्ट केल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

दरम्यान, या भेटीमागील नेमका उद्देश आणि त्यातून पुढे कोणते राजकीय निर्णय घेतले जाणार, याबाबत अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नसून, राष्ट्रवादी काँग्रेसमधील या घडामोडींवर राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Published on: Jul 16, 2026 10:12 AM
Follow Us