‘…खरंच गरज आहे का?’, रोहित पवार यांनी सरकारच्या ७ महिन्यातील जाहिरातींच्या खर्चाचा मांडला हिशोब, एका दिवसाला किती?

| Updated on: Aug 06, 2023 | 9:41 AM

VIDEO | शिंदे सरकारच्या जाहिरातींवरील खर्चाबाबत रोहित पवार यांचा सविस्तर ट्वीट, 'तुमचं काय मत आहे?',जनतेला सवाल करत सरकारवर साधला निशाणा

Follow us on

मुंबई, ६ ऑगस्ट २०२३ | राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी पहिल्या सात महिन्यांत शिंदे-फडणीवस सरकारच्या जाहिरातींवरील झालेल्या खर्चावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. सरकारच्या पहिल्या सात महिन्यात जाहिरातीवरील खर्च ₹ 42.44 कोटी म्हणजेच दिवसाला ₹ 20 लाख खर्च असे म्हणत रोहित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारने केलेल्या खर्चावरील थेट हिशोब मांडत टि्वटद्वारे सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. ‘शासन आपल्या दारी योजनेचा निव्वळ जाहिरातीचा ₹ 52.90 कोटी खर्च, मागच्या वर्षात राबविलेल्या योजनांची यंदा जाहिरात करण्यासाठी ₹ 26 कोटी खर्च आणि सत्ताधारी आमदारांच्या सुरक्षेसाठी एका वर्षाला ₹ 150 कोटी खर्च’, असे त्यांनी ट्वीट करून म्हटले आहे. ‘योजना राबविल्या आहेत, कामं केली आहेत, तर इतकी जाहिरात करण्याची खरंच गरज आहे काृ?, केलेली कामं जनतेपर्यंत पोहचण्यासाठी जाहिराती गरजेच्या आहेत का? हा वायफळ खर्च टाळून, सर्वसामान्यांसाठी कुठली योजना राबविता आली असती का?’, असे अनेक सवाल सरकारपुढे उपस्थित केले आहेत.