Nitin Gadkari | VIP गाडी नाही, थेट बसने प्रवास! नितीन गडकरींची पुण्यातील एंट्री चर्चेत
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे पालखी मार्गाच्या पाहणीसाठी पुण्यात दाखल झाले असून, त्यांच्या दौऱ्यादरम्यान घेतलेल्या एका निर्णयाची राज्यभरात चर्चा सुरू झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचतीचे आवाहन केल्यानंतर नितीन गडकरी यांनी सार्वजनिक वाहतुकीला प्राधान्य देत बसने प्रवास केला आहे.

पालखी मार्गाच्या पाहणीसाठी पुणे दौऱ्यावर येण्यापूर्वीच गडकरी यांनी बसने प्रवास करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली होती. त्यांच्या या निर्णयामुळे इंधन बचत आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या वापराबाबत सकारात्मक संदेश दिला जात असल्याचे मानले जात आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना इंधन बचतीचे आवाहन केल्यानंतर अनेक नेते आणि मंत्र्यांनी आपल्या ताफ्यातील गाड्यांची संख्या कमी करण्यास सुरुवात केली आहे. काही मंत्री सार्वजनिक वाहतुकीचा वापर करत असल्याचेही पाहायला मिळत आहे. नितीन गडकरी यांच्या या कृतीमुळे सामान्य नागरिकांमध्येही सार्वजनिक वाहतूक आणि इंधन बचतीबाबत जनजागृती होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.