Jensen Huang : CEO जेन्सन हुआंग यांच्यावर चिनी महिलेचा हनी ट्रॅप? नेमकं प्रकरण काय?
एनव्हीडियाचे सीईओ जेन्सन हुआंग यांच्यावर चिनी महिलेने हनी ट्रॅप केल्याचा अमेरिकन तपास यंत्रणांना संशय आहे. या प्रकरणामुळे जेन्सन हुआंग यांनी राजीनामा दिला असून, कंपनीचे शेअर्स ३० टक्क्यांनी घसरले आहेत. यामुळे एनव्हीडियाच्या बाजार मूल्यामध्ये तब्बल ४६ लाख कोटींची घट झाली आहे.
एनव्हीडियाचे सीईओ जेन्सन हुआंग यांच्यावर एका चिनी महिलेने हनी ट्रॅप केल्याचा अमेरिकन तपास यंत्रणांना संशय आहे. या प्रकरणामुळे एनव्हीडियाच्या शेअरमध्ये मोठी घसरण झाली असून कंपनीला ४६ लाख कोटी रुपयांचा तोटा झाला आहे.
अमेरिकन यंत्रणांच्या माहितीनुसार, जेन्सन हुआंग यांचे एलिस हुआंग नावाच्या चिनी महिलेसोबत विवाहबाह्य संबंध होते. एलिस हुआंग ही चीनची गुप्तहेर असून तिने एनव्हीडियाच्या चिप्सची गोपनीय माहिती चीनला पुरवल्याचा संशय व्यक्त होत आहे. या प्रेमसंबंधांची कबुली देऊन जेन्सन हुआंग यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
या घडामोडींमुळे अमेरिकन शेअर बाजारात खळबळ उडाली. प्रकरण उघडकीस आल्यापासून एनव्हीडियाच्या शेअरमध्ये ३० टक्क्यांची घट झाली असून, कंपनीचे बाजार मूल्य ४६ लाख कोटींनी कमी झाले आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी सुरू केली असून, अमेरिकन सुरक्षा यंत्रणाही तपास करत आहेत. सद्यस्थितीत, एनव्हीडियाने कोलेट क्रेस यांची अंतरिम सीईओ म्हणून नियुक्ती केली आहे.
