Laxman Hake : आम्ही मर्दाची औलाद..हाकेंकडून आंदोलकांना आईवरून अर्वाच्च शिवीगाळ, बीडच्या गेवराईत तणावाचं वातावरण

Laxman Hake : आम्ही मर्दाची औलाद..हाकेंकडून आंदोलकांना आईवरून अर्वाच्च शिवीगाळ, बीडच्या गेवराईत तणावाचं वातावरण

| Updated on: Aug 26, 2025 | 10:18 AM

बीडच्या गेवराईत पुन्हा एकदा लक्ष्मण हाके आणि अजितदादा गटाचे आमदार विजयसिंह पंडित यांचे समर्थक आमने-सामने आले. जरांगेंचं बॅनर का लावलं? म्हणून हाक्यांनी यापुढे आमच्या दारी आला तर दांडक्यांनी मारू असे वक्तव्य केले होते. त्यावरून हा वाद आता चिघळलाय.

एकीकडे बीडमधून मनोज जरांगेंनी मुंबईत येण्याचा इशारा दिलेला असताना, बीडमध्ये हाके आणि अजित पवार गटाचे आमदार विजयसिंह पंडित यांचे समर्थक भिडले. जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा देत आमदार विजयसिंह पंडित यांच्या समर्थकांनी बॅनर लावलं होतं. त्यावरून हाकेंनी पंडित यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप आहे. हाकेच्या प्रतिक्रियेनंतर गेवराईत पंडित समर्थकांनी हाकेंचे फोटो जाळत निषेध नोंदवलाय. त्याला उत्तर म्हणून स्वतः हाके गेवराईत पोहोचल्यामुळे अजून तणाव वाढला. त्याचा परिणाम दोन्ही बाजूंनं दगड आणि चप्पल फेकण्यात आले.

विशेष म्हणजे गेवराईत हाके दाखल झाल्यानंतर मी फडणवीस समर्थक आहे असं हाकेंनी म्हटलंय. विधानसभेत आमच्यामुळे महायुतीचा विजय झाल्याचा दावाही हाके वारंवार करतायेत. गेवराईत अजितदादा गटाचे उमेदवार विजयसिंह पंडित ओबीसींची मतं घेऊन जिंकल्याचा दावाही हाकेंचा आहे. मात्र स्वतः लक्ष्मण हाके गेवराई विधानसभेत वंचित बहुजन आघाडीचा प्रचार करत होते त्यामुळे हाकेंची नेमकी भूमिका काय असेही प्रश्न उपस्थित होत आहे.

Published on: Aug 26, 2025 10:18 AM