माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? सरपंचाचा संतप्त सवाल

माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? सरपंचाचा संतप्त सवाल

| Updated on: Dec 27, 2024 | 11:21 AM

गावात धुडगूस घालणारे गावगुंड अजूनही मोकाट असल्याचा आरोप सरपंच कुणाल पाटील यांनी केला आहे. न्यायायाच्या आदेशानंतरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे, पण गुंडाना अटक करण्यात आलेली नाही.

माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? उरण तालुक्यातील पागोटे गावात सरपंचाने पोलिसांना हा सवाल विचारला आहे. गावात धुडगूस घालणारे गावगुंड अजूनही मोकाट असल्याचा आरोप सरपंच कुणाल पाटील यांनी केला आहे. न्यायायाच्या आदेशानंतरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे, पण गुंडाना अटक करण्यात आलेली नाही. गावगुंडाच्या अशा दहशतीमुळे गाववाले घाबरले आहेत, याला जबाबदार कोण ? असा सवालही सरपंच कुणाल पाटील यांनी उपस्थित केला आहे. या गावगुंडांच्या दहशतीमुळे ग्रामस्थ कमालीचे घाबरले असून उरण तालुका ‘मस्साजोग’च्या वाटेवर जाण्याची भीती व्यक्त होत आहे. पागोटेवासीयांना न्याय केव्हा मिळणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.

 

Published on: Dec 27, 2024 11:21 AM