‘सिंधूचं पाणी आमची रेड लाईन’; पाकिस्तानचे PM शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी पुन्हा एकदा भारताला सिंधू नदीच्या पाण्यावरून धमकी दिली आहे. पाकिस्तानच्या पाण्याचा प्रत्येक थेंब आमच्यासाठी ‘रेड लाईन’ असल्याचं शरीफ यांनी म्हटलं आहे. इस्लामाबादमध्ये स्मारकाच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलताना शरीफ यांनी भारताने ‘योग्य मार्गावर’ यावं, अन्यथा थेट उत्तर दिलं जाईल, असा इशारा दिला. पाकिस्तानला युद्ध नको, मात्र देशाच्या सार्वभौमत्वाला किंवा सुरक्षेला आव्हान दिल्यास […]
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी पुन्हा एकदा भारताला सिंधू नदीच्या पाण्यावरून धमकी दिली आहे. पाकिस्तानच्या पाण्याचा प्रत्येक थेंब आमच्यासाठी ‘रेड लाईन’ असल्याचं शरीफ यांनी म्हटलं आहे.
इस्लामाबादमध्ये स्मारकाच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलताना शरीफ यांनी भारताने ‘योग्य मार्गावर’ यावं, अन्यथा थेट उत्तर दिलं जाईल, असा इशारा दिला. पाकिस्तानला युद्ध नको, मात्र देशाच्या सार्वभौमत्वाला किंवा सुरक्षेला आव्हान दिल्यास त्याला कठोर प्रत्युत्तर दिलं जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
भारताने 2025 मधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सिंधू जल कराराबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला होता. त्यानंतर भारत-पाकिस्तानमध्ये पाण्याच्या मुद्द्यावरून तणाव कायम आहे. शरीफ यांच्या ताज्या वक्तव्यामुळे या वादाला पुन्हा एकदा तोंड फुटलं आहे.
Published on: Aug 14, 2026 11:36 AM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us
