Kolhapur News : पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ; पाणी पातळी 29 फुटांवर
Panchaganga River : पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झालेली आहे. प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
कोल्हापूरच्या पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झालेली आहे. सध्या नदीच्या पाणी पातळीत 29 फुट 8 इंच इतकी वाढ झाली आहे. सध्या कोल्हापुरात पावसाची जोरदार पाऊस सुरु आहे. त्यामुळे पंचगंगा नदीपात्राच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. आज सकाळी दहा वाजता पंचगंगा नदीची पाणी पातळी 29 फूट 8 इंचावर पोहोचली आहे असून नदी पात्राबाहेर पडली आहे. यंदा पहिल्याच पावसात पंचगंगा नदी पात्राबाहेर गेली आहे. तसेच धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्याने धरणाची पाणीपातळी देखील वाढली आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. धरण क्षेत्रात होणाऱ्या अतिवृष्टीमुळे आणि गतवर्षीच्या तुलनेत धरणात अधिकचा पाणीसाठा असल्याने नदीपात्रात विसर्ग सुरू सुरु आहे. तर आज राधानगरी धरण 63 टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे राधानगरी धरणातून पाण्याचा प्रतिसेकंद 3100 क्युसेक विसर्ग भोगावती नदीत सुरू आहे.
