Baramati | बारामतीत पवार कुटुंबाची दिवाळी, शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांची गर्दी
दिवाळी पाडव्यानिमित्त राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना भेटण्यासाठी राज्यभरातून कार्यकर्ते बारामतीमध्ये जमत असतात. यंदा हा दिवाळी कार्यक्रम अप्पासाहेब पवार सभागृहात पार पडणार आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्रीही उपस्थिती लावणार आहेत. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे दुपारी 12 वाजता शरद पवार यांची भेट घेणार आहेत.
महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात नेहमीच चर्चेचा विषय असणारे पवार कुटुंबीय दिवाळीच्यानिमित्ताने दरवर्षीप्रमाणे बारामतीमध्ये एकत्र जमले आहेत. काल लक्ष्मीपूजनानंतर पवार कुटुंबीयांची मेजवानी पार पडली. यावेळी गोविंदबागेतील हिरवळीवर एकत्रित येत पवार कुटुंबाने खास फोटोसेशन केले. यावेळी प्रतिभा पवार, सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यासह कुटुंबातील इतर सदस्य उपस्थित होते. हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.