PM Modi Birthday निमित्त पठ्ठयानं धान्यातून कुठं साकारलं भव्य पोट्रेट, बघा व्हिडीओ

PM Modi Birthday निमित्त पठ्ठयानं धान्यातून कुठं साकारलं भव्य पोट्रेट, बघा व्हिडीओ

Harshada Shinkar | Updated on: Sep 16, 2023 | 8:07 AM

VIDEO | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा १७ सप्टेंबर, रविवारी वाढदिवस आहे. पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त एकूण पन्नास किलोपेक्षा जास्त धान्याचा वापर करून कुठं साकारले १८ बाय १० आकाराचे भव्य पोट्रेट

पुणे, १६ सप्टेंबर २०२३ | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त कसबा विधानसभा मतदार संघातील भाजपचे कार्यकर्ते आणि जय भवानी सहकारी बँकेचे संचालक किशोर उर्फ राजेंद्र तरवडे यांच्या वतीने मोदी यांचे धान्यापासून १८ बाय १० आकाराचे पोट्रेट साकारण्यात आले आहे. कालिका माता मंदिर, तपकिर गल्ली, बुधवार पेठ आणि पुणे येथे या पोट्रेटचे अनावरण काल करण्यात आले. १६ ते १८ सप्टेंबर दरम्यान हे पोट्रेट पुणेकरांना विनामूल्य बघता येणार आहे. हे भव्य पोट्रेट गणेश खरे, सुधीर शिंदे आणि त्यांच्या टीमने साकारले असून एकूण १६ तासांचा कालावधी लागला आहे. या पोट्रेटमध्ये गहू, तीन प्रकारचे तीळ, ज्वारी, डाळ, हळीव, मूग, मटकी यांचा वापर करण्यात आला असून एकूण धान्य पन्नास किलोपेक्षा जास्त असल्याचेही राजेंद्र तरवडे यांनी सांगितले.

Published on: Sep 16, 2023 08:07 AM
Follow Us