पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ‘ते’ बॅनर आताच का होतंय व्हायरल?

| Updated on: Jan 19, 2023 | 1:03 PM

दक्षिण मुंबईतील गिरगाव, मरीन लाइन्स या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे 'ते' बॅनर लावण्यात आले असून या बॅनर्सची जोरदार चर्चा होताना दिसत आहे. हे बॅनर लावणारी व्यक्ती अज्ञात असला तरी भाजपला डिवचण्यासाठीच हे बॅनर्स लावण्यात आल्याची रंगतेय चर्चा

Follow us on

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावर असताना मोदी हे विविध विकास कामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन करणार आहेत. मोदी मुंबईत येणार असल्याने भाजप-शिंदे गटाकडून जय्यत तयारी करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईतील प्रत्येक रस्त्यावर, चौकात मोदींचे बॅनर्स, होर्डिंग्ज, पोस्टर्स आणि कटआऊट झळकल्याचे पाहायला मिळत आहेत. मात्र अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बॅनर अचानक व्हायरल होत असून सर्वत्र त्याचीच चर्चा आहे.

दक्षिण मुंबईतील गिरगाव आणि मरीन लाइन्स या ठिकाणी हे बॅनर्स लावण्यात आली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबईतील दौऱ्यापूर्वीच हे बॅनर्स लावण्यात आले आहेत. बाळासाहेबांपुढे मोदींची मान झुकते, अशा आशयाच्या पोस्टर्सची चांगलीच बॅनरबाजी करण्यात आली आहे. त्यामुळे या बॅनर्सची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. या बॅनर्सवर कोणताही मजकूर लिहिलेला नाही. तसेच या बॅनर्सवर फक्त शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो आहे.