Special Report | संजय राऊत-चंद्रकांत पाटलांची ‘सव्वा रुपयां’ची लढाई!

Special Report | संजय राऊत-चंद्रकांत पाटलांची ‘सव्वा रुपयां’ची लढाई!

| Edited By: | Updated on: Sep 22, 2021 | 9:20 PM

शिवसेना नेते संजय राऊत आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यातील शाब्दिक चकमक आता अब्रुनुकसाणीच्या दाव्यापर्यंत पोहोचली आहे. 'सामना'च्या अग्रलेखातील टीकेला प्रत्युत्तर देताना चंद्रकांत पाटील यांनी राऊतांना तिखट शब्दात पत्र लिहिलं

शिवसेना नेते संजय राऊत आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यातील शाब्दिक चकमक आता अब्रुनुकसाणीच्या दाव्यापर्यंत पोहोचली आहे. ‘सामना’च्या अग्रलेखातील टीकेला प्रत्युत्तर देताना चंद्रकांत पाटील यांनी राऊतांना तिखट शब्दात पत्र लिहिलं. त्यामध्ये पीएमसी बँक प्रकरणी पैसे परत करुन राऊतांनी प्रकरण मिटवल्याचं चंद्रकांत पाटलांनी म्हटलं. त्यानंतर आता राऊतांनी चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात सव्वा रुपयाचा दावा करण्याची तयारीसुद्धा केली आहे. याच विषयावर सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !