President Droupadi Murmu : राष्ट्रपतीपदी पोहोचणे माझे नव्हे देशातील प्रत्येक गरिबांचे यश- राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

President Droupadi Murmu : राष्ट्रपतीपदी पोहोचणे माझे नव्हे देशातील प्रत्येक गरिबांचे यश- राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

| Updated on: Jul 25, 2022 | 11:20 AM

लोकशाहीच्या शक्तीने मला इथपर्यंत पोहोचवले आहे. देशावासियांचे हित माझ्यासाठी सर्वोपरी आहे. सर्वांच्या प्रयत्नानेच उज्ज्वल भविष्याचं निर्माण होईल. मला राष्ट्रपती म्हणून निवडून दिल्याबद्दल सर्वांचे आभार, असं त्या म्हणाल्या.

नवी दिल्लीः  देशाचे सर न्यायाधीश एन. व्ही. रमण्णा (N V Ramanna) यांनी द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपती पदाची शपथ दिली. आज देशाचे 15 वे राष्ट्रपती (Indian President) म्हणून यांनी द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांनी आज संसद भवनात श पथ घेतली. सव्वा दहा वाजेच्या सुमारास देशाचे सर न्यायाधीश एन. व्ही. रमण्णा (N V Ramanna) यांनी द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपती पदाची शपथ दिली. ‘राष्ट्रपतीपदी माझी निवड केल्याबद्दल मी देशातील जनतेचं अभिनंदन करते. ही जबाबदारी मिळणं हे माझं सौभाग्य आहे. मी राष्ट्रपतीपदापर्यंत पोहोचले हे माझं वैयक्तिक यश नाही. तर हे देशातील प्रत्येक गरिबांचे यश आहे, असं द्रौपदी मुर्मू यावेळी म्हणाल्यात. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह देशातील सर्वच पक्षाचे नेते, सर्व केंद्रीय मंत्री आणि सर्वच राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते. यावेळी सर्वांनी नवनिर्वाचित राष्ट्रपतींचं अभिनंदन केलं.

Published on: Jul 25, 2022 11:20 AM