Khed Accident : दर्शनापूर्वी पांढऱ्या साड्यांची खरेदी पण दुर्दैवानं त्यांचं झालं कफन, कुंडेश्वराला जाणारी व्हॅन पलटी अन् 10 महिलांचा मृत्यू

Khed Accident : दर्शनापूर्वी पांढऱ्या साड्यांची खरेदी पण दुर्दैवानं त्यांचं झालं कफन, कुंडेश्वराला जाणारी व्हॅन पलटी अन् 10 महिलांचा मृत्यू

| Updated on: Aug 12, 2025 | 11:19 AM

कुंडेश्वर अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना केंद्राकडून दोन तर राज्याची चार लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तर जखमींना पन्नास हजारांची मदत व सर्व उपचार मोफत करण्याची राज्य सरकारने घोषणा केली आहे. 

पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात, कुंडेश्वर येथे श्रावणी सोमवारनिमित्त दर्शनासाठी निघालेल्या महिला भाविकांच्या पिकअप टेम्पोला भीषण अपघात झाला. या अपघातात एकूण १० महिला भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून २९ महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.  या अपघातात मृत झालेल्या भाविकांचे शवविश्चेदन करण्यात आले. पाच ते सहा रुग्णवाहिकेतून हे मृतदेह पाईट येथील पापळवाडीमध्ये नेण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, कुंडेश्वर अपघातातील सर्व महिला या पाईट पापळवाडी गावातील काळूबाई महिला बचत गटाच्या सदस्या होत्या. कुंडेश्वर देवस्थानाच्या दर्शनासाठी जायचे म्हणून त्यांनी सुमारे आठवडाभरा पूर्वीच पाईट एका कापड दुकानातून पांढऱ्या रंगाच्या आणि त्यावर हलके डिझाइन असलेल्या सुमारे ५० साड्या खरेदी केल्या होत्या. याच पांढऱ्या साड्या परिधान करून या सर्व महिला परिधान करून या महिला कुंडेश्वर दर्शनाला निघाल्या होत्या. मात्र दर्शनापूर्वीच त्यांच्यावर काळाने घाला घातल्याने या पांढऱ्या साड्याच दुर्दैवाने त्यांचे कफन झाल्या. अपघातापूर्वी या महिल्या गाणे गात असल्याचा एक व्हिडीओही आता समोर आलाय. या दुःखद घटनेमुळे पाईट गाव आज दिवसभर बंद राहणार आहे.

Published on: Aug 12, 2025 11:19 AM