Pune Ganeshotsav : आम्हाला समोसा अन् त्यांना बिर्याणी… इतर मंडळवाले प्रजा अन् मानाचे मंडळवाले राजा? पोलीस आयुक्तांवर दुजाभाव?

Pune Ganeshotsav : आम्हाला समोसा अन् त्यांना बिर्याणी… इतर मंडळवाले प्रजा अन् मानाचे मंडळवाले राजा? पोलीस आयुक्तांवर दुजाभाव?

| Updated on: Aug 06, 2025 | 1:12 PM

पुण्यात मानाचे गणपती मंडळ आणि इतर मंडळांचे पदाधिकाऱ्यांची बैठक झालेली आहे आणि पोलीस आयुक्तांनी ही बैठक बोलावली होती. विसर्जन मिरवणुकीचा नियोजन हा या बैठकीचा अजेंडा होता. मात्र ही बैठक वेगळ्याच कारणाने गाजली

पुण्यात गणेशोत्सवासाठी पोलिसांनी बोलावलेली बैठक मानापमानं वादात राहिली. विसर्जन मिरवणुकीच्या नियोजनासाठी पोलीस आयुक्तांनी बैठक बोलावली होती. त्यासाठी पोलीस आयुक्तालयात पुण्यातील इतर गणेश मंडळ आणि पुण्यातील मानाच्या गणपती मंडळांचे पदाधिकारी उपस्थित राहिले. मात्र पोलीस प्रशासनाने बैठकीत इतर गणेश मंडळ पदाधिकाऱ्यांना समोसा तर मानाच्या गणपती मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना व्हेज बिर्याणी दिल्याचा आरोप झाला. त्यावरून इतर मंडळांचे पदाधिकारी म्हणजे प्रजा आणि मानाच्या मंडळांचे पदाधिकारी म्हणजे राजा असा आरोप झाला. सार्वजनिक गणेशोत्सवाच्या बैठकीतच पुणे पोलिसांकडून दुजाभाव का असेही सवाल उपस्थित झाले.

बैठकीचं कारण विसर्जन मिरवणूक कशी निघावी हे होतं. पुण्यात इतर गणपतींच्या विसर्जन मिरवणुका आधी निघतात त्यानंतर मानाच्या गणपतींच्या मिरवणुकांची सुरुवात होते. मात्र परंपरेनुसार जो मानाच्या गणपतींचं विसर्जन होत नाही तोवर इतर गणेश मंडळ विसर्जन करत नाहीत. त्यामुळे मानाच्या गणेश मंडळांनी लवकर मिरवणुका सुरू कराव्या, अशी इतर गणेश मंडळांची मागणी होती. आता जर तोडगा इतर गणेश मंडळ आणि मानाचे गणेश मंडळ यांच्यात काढायचा असेल तर पोलीस आयुक्तांनी दोघांना एकाच वेळी बोलावणं अपेक्षित होतं. मात्र आरोपानुसार परेड सीपी म्हणून ख्याती असलेले अमितेश कुमार यांनी इतर मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक १२ च्या दरम्यान तर मानाच्या गणेश मंडळाची बैठक दीडच्या दरम्यान घेतली.

Published on: Aug 06, 2025 01:12 PM