पुण्यातील रेव्ह पार्टीच्या अंधारात खूप काही घडलं, 150 पैकी 72 जण गेले तरी कुठे? वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप!
पुण्यातील कथित रेव्ह पार्टी प्रकरणावरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकार आणि गृहखात्यावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. या पार्टीमध्ये तब्बल 156 तरुण-तरुणी उपस्थित होते, मात्र केवळ 78 जणांवरच एफआयआर दाखल करण्यात आल्याने संशय व्यक्त केला जात आहे.

विजय वडेट्टीवार यांनी विचारले की, उर्वरित 78 जणांना रात्री परस्पर कुणाच्या सांगण्यावरून सोडण्यात आले? तसेच पार्टीमध्ये ड्रग्जचा वापर झाल्याचे स्पष्ट असतानाही फक्त 29 जणांचीच अमली पदार्थ चाचणी करण्यात आली, यावरही त्यांनी आक्षेप घेतला आहे.
श्रीमंतांच्या मुलांना पैशांच्या जोरावर वाचवले जात असून गरीबांच्या मुलांवरच कारवाई केली जाते का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. संपूर्ण 156 जणांवर गुन्हा का दाखल करण्यात आला नाही, याचे उत्तर गृहखात्याने द्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
पुण्यात ड्रग्ज रॅकेट वाढत असताना प्रशासन आणि पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप करत या प्रकरणातील फोन कॉल्स आणि दबावाची सखोल चौकशी करण्याची मागणीही विजय वडेट्टीवार यांनी केली.