Pune | पुण्यात आज भक्तीचा महासंगम! ज्ञानोबा-तुकाराम पालखीचे आगमन; वारकरी-धारकरी एकत्र
संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या आषाढी पालखी सोहळ्याचे आज पुणे शहरात आगमन होत असून, संपूर्ण शहर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाले आहे. 'ज्ञानोबा-तुकाराम' आणि 'विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल'च्या अखंड गजरात हजारो वारकरी पुण्यात दाखल होत आहेत.
संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या आषाढी पालखी सोहळ्याचे आज पुणे शहरात आगमन होत असून, संपूर्ण शहर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाले आहे. ‘ज्ञानोबा-तुकाराम’ आणि ‘विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल’च्या अखंड गजरात हजारो वारकरी पुण्यात दाखल होत आहेत.
यंदा पुण्यात वारकरी आणि धारकरी यांचा संगम पाहायला मिळणार असून, या पार्श्वभूमीवर शहरात मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होत आहे. पालखी सोहळ्यामुळे प्रमुख मार्गांवर वाहतूक नियोजन करण्यात आले असून, पोलिसांकडून चोख सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.
दरम्यान, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे हे आज दोन्ही पालखी सोहळ्यांमध्ये सहभागी होणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्याआधी पुण्यातील जंगली महाराज मंदिर परिसरात संभाजी भिडे आणि धारकरी एकत्र जमले असून, तेथून ते संचेती चौकाच्या दिशेने प्रस्थान करणार आहेत.
या पार्श्वभूमीवर जंगली महाराज मंदिर परिसर, संचेती चौक आणि पालखी मार्गावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच पालखी सोहळा सुरळीत पार पडावा यासाठी प्रशासनाकडून आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
