राहुल गांधींचे निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; म्हणाले..
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाच्या विरोधात भाष्य करत गंभीर आरोप केले आहेत.
निवडणूक आयोगाच्या विरोधात आमच्याकडे पुरावे असल्याचं कॉंग्रेसचे विरोधीपक्ष नेता राहुल गांधी यांनी म्हंटलं आहे. निवडणूक आयोग नाही, तर हा भलताच आयोग असल्याचं देखील त्यांनी म्हंटलं. हे प्रकरण गंभीर असून आम्ही मागे हटणार नसल्याचंही राहुल गांधींनी यावेळी सांगितलं.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सांगितले की, त्यांनी आज केलेले काही दावे पूर्णपणे निराधार आणि मूर्खपणाचे आहेत. खरी वस्तुस्थिती अशी आहे की, निवडणूक आयोग आपले कर्तव्य नीट पार पाडत नाही. त्यांनी पुढे म्हटले की, आमच्याकडे आता १००% ठोस पुरावे आहेत की, कर्नाटकातील एका मतदारसंघात निवडणूक आयोगाने फसवणुकीला परवानगी दिली. आम्ही केवळ एका मतदारसंघाचा अभ्यास केला आणि तिथे आम्हाला स्पष्ट पुरावे मिळाले, असे त्यांनी नमूद केले.
Published on: Jul 24, 2025 03:54 PM
