Rahul Gandhi : फॉर्म सिक्समध्ये बेकायदेशीर बदल सिद्ध; राहुल गांधींचा ज्ञानेश कुमारांवर गंभीर आरोप, म्हणाले…

Rahul Gandhi : फॉर्म सिक्समध्ये बेकायदेशीर बदल सिद्ध; राहुल गांधींचा ज्ञानेश कुमारांवर गंभीर आरोप, म्हणाले…

| Updated on: Oct 05, 2026 | 7:39 PM

राहुल गांधींनी निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर फॉर्म सिक्समध्ये बेकायदेशीरपणे बदल केल्याचा आणि पदाचा गैरवापर करत भाजपला मदत केल्याचा आरोप केला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या टिप्पणीनंतर राहुल गांधींनी ट्विट करत ज्ञानेश कुमार यांना लोकशाहीवरील हल्ल्यात सहभागी असल्याचे म्हटले. यावर पलटवार करत, राहुल गांधींचे हे कृत्य फेक नरेटिव्हचे दुकान आणि अराजकता पसरवण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले जात आहे.

राहुल गांधींनी निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ज्ञानेश कुमार यांनी फॉर्म सिक्समध्ये बेकायदेशीरपणे बदल केल्याचे सिद्ध झाल्याचा दावा राहुल गांधींनी केला आहे. भाजपच्या मदतीसाठी पदाचा गैरवापर केल्याचा हा आणखी एक पुरावा असल्याचा आरोप त्यांनी केला. सर्वोच्च न्यायालयाने केलेल्या टिप्पणीनंतर राहुल गांधींनी ट्विट करत निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर निशाणा साधला.

ज्ञानेश कुमार यांनी बेकायदेशीरपणे आणि एकतर्फी फॉर्म सिक्समध्ये बदल केला हे आता निःसंशय सिद्ध झाले आहे, असे राहुल गांधी म्हणाले. भाजपला मदत करण्यासाठी ज्ञानेश कुमार यांनी आपल्या पदाचा गैरवापर केला असल्याचा हा आणखी एक पुरावा आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. लोकशाहीवरच्या गुन्हेगारी हल्ल्यामध्ये सहभागी असलेल्या ज्ञानेश कुमार आणि इतर सर्वांना यासाठी जबाबदार धरले जाईल, अशी पोस्ट राहुल गांधींनी केली आहे.

राहुल गांधींनी निवडणूक आयोगाने काढलेली प्रेस नोट देखील पोस्ट केली आहे. या प्रेस नोटमध्ये निवडणूक आयोगाने फॉर्म सिक्ससोबतच्या घोषणापत्रासाठी सर्वोच्च न्यायालयाने मंजुरी दिल्याचं म्हटले होते. या आरोपांवर प्रतिक्रिया देताना, राहुल गांधींचे हे कृत्य फेक नरेटिव्ह शॉप म्हणजेच फेक नरेटिव्हचे एक दुकान आहे, असे म्हटले गेले आहे. खोटे बोलून, अराजकता पसरवून आणि स्वतःचे संपलेले राजकारण पुन्हा जिवंत करण्याकरता खोटे बोलून लोकांची माथी भडकवून अराजकता पसरवण्याचा प्रयत्न राहुल गांधी करत असल्याचेही म्हटले जात आहे.

Published on: Oct 05, 2026 7:39 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us