Rahul Gandhi : ‘हे’ 5 पॅटर्न अन् मतांची भरभरून चोरी, राहुल गांधींचा खळबळजनक दावा, आरोप नेमके काय?
गेले काही महिन्यांपासून राहुल गांधी मतदान चोरीचा आरोप करत होते आणि आता तर त्यांनी पुरावे दाखवत मतदान चोरीचा आरोप केलाय. ज्यात महाराष्ट्रात सुद्धा एक कोटी मतदार वाढल्याचं राहुल गांधी हे म्हणालेत. एकूण पाच पद्धतीनं मतदानाच्या चोरीचा पॅटर्न असल्याच राहुल गांधींनी म्हटलंय.
महाराष्ट्राच्या विधानसभेसह कर्नाटकातल्या विधानसभेत आणि लोकसभा निवडणुकीत सुद्धा मतांची चोरी झाल्याचा आरोप करत राहुल गांधींनी पुरावे सादर केले. महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीनंतर सहाच महिन्यात एक कोटी नवे बनावट मतदार वाढल्याचा आरोप राहुल गांधींनी केलाय. कर्नाटक विधानसभेच्या महादेवपुरा मतदारसंघात संघाच्या यादी काँग्रेसने निवडणूक आयोगाला मागितल्या. मात्र डिजिटल यादी न देता सात फुटांच्या अशा कागदपत्री यादी दिल्याच राहुल गांधींनी दाखवलं. याच महादेवपुरा विधानसभा मतदारसंघात 1,00,250 मत खोटी असून पाच प्रकारे मतांच्या चोरीचा फॉर्म्युला असल्याच राहुल गांधींनी म्हटलय. या 1,00,250 मतांमध्ये खोटे मतदार 11,965 आहेत. खोटे आणि चुकीचे पत्ते टाकून वाढवलेली मत 40,009 इतकी आहेत. तर एकाच पत्त्यावर अनेक मतदारांची संख्या असलेले 10,452 मतदार आहेत. फोटो नसलेले किंवा ओळखता न येणारे मतदार हे 4,132 आहेत आणि फर्स्ट टाईम वोटरच्या फॉर्म नंबर सहाचा दुरुपयोग करून वाढवलेले मतदार तब्बल 33,692 इतके असल्याचे थेट राहुल गांधींनी पुराव्यासह दाखवलं.
