Rahul Gandhi : 70 वर्षांची महिला फर्स्ट टाईम व्होटर अन् एकाच घरात तब्बल 80 मतदार, राहुल गांधींकडून पुराव्यांसह पोलखोल

Rahul Gandhi : 70 वर्षांची महिला फर्स्ट टाईम व्होटर अन् एकाच घरात तब्बल 80 मतदार, राहुल गांधींकडून पुराव्यांसह पोलखोल

| Updated on: Aug 07, 2025 | 4:38 PM

७० वर्षीय शकुन राणी यांनी मतदार ओळखपत्र काढण्यासाठी महिन्यातून दोनदा फॉर्म ६ भरला. एकदा त्यांचा फोटो दूरून काढला तर दुसऱ्यांदा त्यांनी झूम इन करून फोटो अपलोड केला. फॉर्म ६ द्वारे ज्याने यापूर्वी कधीही मतदार कार्ड काढलेले नाही, तो मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी फॉर्म ६ हा अर्ज करतो.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गुरुवारी मतदार यादीत करण्यात आलेल्या हेराफेरीवर तब्बल १ तास ११ मिनिटांपर्यंत २२ स्लाईड्सचे प्रेझेंटेशन दिले. यावेळी राहुल गांधी यांनी मतदार यादी स्क्रीनवर दाखवत केंद्रीय निवडणूक आयोगावरच गंभीर आरोप करत मतदार यादीत संशयास्पद मतदार असल्याचे म्हणत थेट पुरावे सादर केलेत.

यावेळी राहुल गांधी म्हणाले, महाराष्ट्रातील निवडणुकीचा निकाल पाहिल्यानंतर आम्हाला आलेला संशय खरा ठरला आणि निवडणूक घोटाळा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मशीनकडून रीडेबल मतदार यादी मिळत नव्हती, त्यामुळे सिद्ध झाले की, निवडणूक आयोगाने भाजपसोबत महाराष्ट्र निवडणुकीच वोट चोरी केली. यावेळी राहुल गांधींनी काही पुरावे देत आरोप सिद्ध करून दाखवले. जसे की, एकाच पत्त्यावर अनेक मतदार सापडले. ४७० क्रमांकाच्या बूथवरील ३५ क्रमांकाच्या घरावर ८० मतदार आढळले. तर ७० वर्षांच्या महिलेचा फर्स्ट टाईम व्होटर म्हणून सहभाग करण्यात आला होता.

Published on: Aug 07, 2025 04:38 PM