त्या’ एका विधानाने सर्वत्र खळबळ! दिल्लीतील CJP च्या आंदोलनाबाबत राहुल गांधी स्पष्टच म्हणाले

त्या’ एका विधानाने सर्वत्र खळबळ! दिल्लीतील CJP च्या आंदोलनाबाबत राहुल गांधी स्पष्टच म्हणाले

| Updated on: Jul 21, 2026 | 1:19 PM

दिल्लीतील जंतर मंतर येथे NEET पेपरफुटी प्रकरणावरून CJP कॉक्रेज जनता पार्टीने आंदोलन केले. या आंदोलनामुळे देशभरात या मुद्द्याची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. आंदोलनादरम्यान मोठा गोंधळ उडाला असून पोलिस आणि आंदोलक आमनेसामने आल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.

दिल्लीतील जंतर मंतर मैदानावर विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू असताना विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज झाल्याचा आरोप करण्यात आला. या घटनेनंतर अनेक राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. या प्रकरणामुळे NEET पेपरफुटीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

यावर प्रतिक्रिया देताना राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप केला. त्यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली. तसेच नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांची माफी मागावी, असेही त्यांनी म्हटले.

राहुल गांधी यांनी सरकारवर जोरदार टीका करत केंद्र सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले. त्यांनी विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. यासोबतच राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी राजीनामा द्यावा, अशीही मागणी केली. या संपूर्ण प्रकरणामुळे राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Published on: Jul 21, 2026 1:09 PM
Follow Us