Rahul Narwekar | पोलिंग स्टेशनवर मी जाणं चुकीचं होतं, तर हरीभाऊ राठोड पूजा करायला गेले होते का?
नार्वेकर यांनी हरिभाऊ राठोड यांच्या पोलिंग स्टेशनवरील उपस्थितीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले की, जर माझी उपस्थिती अनुचित होती, तर हरिभाऊ राठोड तिकडे काय करत होते? आम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाच्या मर्यादेतच कार्य करत असल्याचा त्यांनी पुनरुच्चार केला.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी उमेदवारांसोबत अर्ज भरण्यासाठी उपस्थित राहण्यामागील भूमिका स्पष्ट केली आहे. नार्वेकर यांनी सांगितले की, कुलाब्याचे प्रतिनिधी म्हणून आपल्या मतदारसंघातील नगरसेवक किंवा उमेदवारांसोबत जाऊन फॉर्म भरणे स्वाभाविक होते, कारण प्रत्येक उमेदवाराला आपल्या आमदाराची सोबत अपेक्षित असते.
नार्वेकर यांनी निवडणूक आयोगाच्या नियमांचा हवाला देत म्हटले की, एका उमेदवारासोबत दोन प्रतिनिधी जाऊ शकतात, त्यामुळे त्यांनी नियमांचे पालन केले. आरोच्या कार्यालयातून बाहेर पडताना काही माजी विधानपरिषद सदस्य आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आपल्याला घेराव घालून धक्काबुक्की केल्याचा आरोप नार्वेकर यांनी केला. तसेच, दिलेल्या सुरक्षेचा गैरवापर करून गोंधळ निर्माण करणे योग्य नसल्याचे ते म्हणाले.