राज आणि उद्धव यांना एकत्र पहायला महाराष्ट्राला 20 वर्ष वाट का पहावी लागली ?
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी 20 वर्षांनंतर एकत्र येत, दिलेल्या संयुक्त मुलाखतीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका आणि मुंबईच्या भवितव्यासाठी हे दोन्ही नेते एकत्र आले आहेत. या मुलाखतीत महाराष्ट्रासमोरील संकटांवर चर्चा करण्यात आली.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackrey) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackrey) यांची बहुप्रतीक्षित संयुक्त मुलाखत नुकतीच पार पडली. सामनाच्या व्यासपीठावरून झालेल्या या मुलाखतीची संपूर्ण महाराष्ट्राला आणि विशेषतः मराठी माणसांना तब्बल वीस वर्षांपासून प्रतीक्षा होती. या मुलाखतीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडींना सुरुवात झाली आहे. मुंबईसह २९ महानगरपालिकांच्या आगामी निवडणुका महाराष्ट्राचे आणि मुंबईचे भवितव्य ठरवणार असून, याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या एकत्रित येण्यामुळे मराठी माणसांच्या मनात अनेक प्रश्न असले तरी मोठा आनंदही व्यक्त होत आहे.
बऱ्याच कालावधीनंतर, म्हणजे जवळपास वीस वर्षांनंतर, हे दोन्ही नेते एकत्र येऊन मुंबई आणि महाराष्ट्राच्या भविष्यावर चर्चा करत आहेत. महाराष्ट्राची जनता या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होती. महाराष्ट्राच्या मनात एक समान प्रश्न आहे की, या एकत्र येण्यासाठी वीस वर्षे का लागली? असा सवालही विचारण्यात आला. त्यावर ठाकरे बंधूंनी काय उत्तर दिलं ? जाणून घेऊया.
