#RajThackeray | पुरंदरे ते आशाताईंचं कौतुक, राज ठाकरेंचं संपूर्ण भाषण

#RajThackeray | पुरंदरे ते आशाताईंचं कौतुक, राज ठाकरेंचं संपूर्ण भाषण

| Edited By: | Updated on: Aug 14, 2021 | 3:31 PM

व्यासपीठावरुन उपस्थितांशी संवाद साधताना राज ठाकरे यांनी मास्क लावला नव्हता. खरं तर गेल्याच महिन्यात राजकीय दौऱ्यावर असताना राज ठाकरे पुण्यात बाबासाहेब पुरंदरेंच्याही भेटीला गेले होते. संपूर्ण दौऱ्यात विनामास्क दिसलेले राज ठाकरे बाबासाहेबांच्या भेटीवेळी मात्र मास्क घालून होते.

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे (Babasaheb Purandare) यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यानिमित्त पुण्यात कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या सोहळ्याला चिरतरुण आवाजाच्या गायिका आशा भोसले (Asha Bhosle) , मनसे अध्यक्ष राज ठाकरे  (Raj Thackeray) भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar),  महापौर मुरलीधर मोहोळ यासारख्या मान्यवरांनी उपस्थिती लावली. यावेळी “अर्ध्या झाकलेल्या अन् अर्ध्या उघड्या असलेल्या चेहऱ्याच्या माझ्या बांधवांनो” अशा अनोख्या शैलीत राज ठाकरे यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली आणि एकच हशा पिकला.

व्यासपीठावरुन उपस्थितांशी संवाद साधताना राज ठाकरे यांनी मास्क लावला नव्हता. खरं तर गेल्याच महिन्यात राजकीय दौऱ्यावर असताना राज ठाकरे पुण्यात बाबासाहेब पुरंदरेंच्याही भेटीला गेले होते. संपूर्ण दौऱ्यात विनामास्क दिसलेले राज ठाकरे बाबासाहेबांच्या भेटीवेळी मात्र मास्क घालून होते. त्यामुळे राज ठाकरेंनी पहिल्यांदाच घातलेल्या मास्कच्या चर्चाही रंगल्या होत्या. परंतु आजच्या जन्मशताब्दी सोहळ्यात व्यासपीठावर बहुतांश मान्यवरांनी मास्क घातला नव्हता. मात्र मास्कधारी प्रेक्षकांना संबोधताना राज ठाकरेंनी “अर्ध्या झाकलेल्या अन् अर्ध्या उघड्या असलेल्या चेहऱ्याच्या माझ्या बांधवांनो” अशी मार्मिक सुरुवात केली.