Thackeray Brothers Alliance : ठाकरे बंधूंची युती जाहीर…राज ठाकरे यांच्या घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांना धार

Thackeray Brothers Alliance : ठाकरे बंधूंची युती जाहीर…राज ठाकरे यांच्या घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांना धार

| Updated on: Dec 24, 2025 | 5:46 PM

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी युतीची घोषणा केली असून, मुंबईचा महापौर मराठीच होणार असा दावा केला आहे. भाजपने या युतीवर टीका केल्यानंतर राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांचा अल्ला हाफिज व्हिडिओ असल्याचा दावा करत सत्ताधाऱ्यांना इशारा दिला. मुंबईच्या भविष्यावरून राजकीय घमासान सुरू झाले आहे.

ठाकरे बंधूंनी एकत्र येत महाराष्ट्राच्या राजकारणात नवी समीकरणे तयार केली आहेत. मुंबईतील हॉटेल ब्लू सी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या युतीची घोषणा केली. मुंबईचा महापौर मराठीच होणार आणि तो आपलाच असेल, असा ठाम विश्वास राज ठाकरेंनी व्यक्त केला. तर, दिल्लीतील नेत्यांकडून मुंबईचे तुकडे करण्याच्या मनसुब्यांना हाणून पाडू, असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला.

या युतीनंतर भाजपने ठाकरे बंधूंवर टीका केली. आशिष शेलार यांनी “लाव रे तो व्हिडीओ” म्हणत त्यांच्या जुन्या भूमिकांवरून प्रश्नचिन्ह उपस्थित केले. यावर पलटवार करत राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांचा “अल्ला हाफिज” म्हणतानाचा व्हिडिओ आपल्याकडे असल्याचा दावा केला आणि सत्ताधाऱ्यांवर हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून निशाणा साधला. तसेच, देवेंद्र फडणवीस हिंदुत्वातच जन्मले आणि हिंदुत्वातच मरणार, असे ते म्हणाले. भाजप नेते रावसाहेब दानवे यांच्या टीकेला उत्तर देताना राज ठाकरेंनी दानवांना उत्तर देण्याची गरज नसल्याचे सांगितले. एकनाथ शिंदे यांनीही राज ठाकरेंच्या “मुलांच्या टोळ्या” या वक्तव्यावर प्रत्युत्तर दिले.

Published on: Dec 24, 2025 05:46 PM