हॉटेल,मुंबई लोकलमधील निर्बंध हटवले, मास्क लावणं ऐच्छिक : राजेश टोपे

| Updated on: Mar 31, 2022 | 7:15 PM

मुख्यमंत्री आणि राज्याच्या मंत्रिमंडळानं महत्त्वाचा निर्णय घेतला. गुढीपाडवा 2 एप्रिलपासून साथरोग कायदा आणि आपत्ती निवारण कायद्याची अमंलबजावणी मागं घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे,अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

Follow us on

मुख्यमंत्री आणि राज्याच्या मंत्रिमंडळानं महत्त्वाचा निर्णय घेतला. गुढीपाडवा 2 एप्रिलपासून साथरोग कायदा आणि आपत्ती निवारण कायद्याची अमंलबजावणी मागं घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे,अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. हॉटेलमध्ये, रेस्टॉरंटमध्ये पन्नास टक्के, मुंबई लोकलमध्ये कोरोना लसीचे दोन डोस आवश्यक असणं आणि मास्क आवश्यक होतं त्या अटी शिथील करण्यात आलं आहे. मास्क घालणं अनिवार्य नसलं तरी ऐच्छिक आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा दिवस 14 एप्रिल हा दिवस सुद्धा आपण पूर्ण उत्साहानं साजरा करता येतील. येणारे सण देखील आनंदात साजरे करता येतील, असं राजेश टोपे म्हणाले. तर, राज्य सरकारचे शासकीय कर्मचारी अधिकारी यांच्या वैदकीय चाचणीसाठी 5 हजार रुपये खर्च करण्यात येणार आहेत. राज्य सरकार जवळपास 22 लाख शासकीय कर्मचाऱ्यांसाठी 105 कोटी रुपये खर्च करणार आहे, असं राजेश टोपे म्हणाले.