Special Report | वानखेडेंसाठी रामदास आठवले मैदानात !

Special Report | वानखेडेंसाठी रामदास आठवले मैदानात !

| Edited By: | Updated on: Oct 31, 2021 | 10:40 PM

एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावरील आरोपांवरुन थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार असल्याचा दावा रिपाई अध्यक्ष रामदास आठवले यांनी केलाय.

एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावरील आरोपांवरुन थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार असल्याचा दावा रिपाई अध्यक्ष रामदास आठवले यांनी केलाय. एकीकडे राष्ट्रवादीचे नवाब मलिक पिच्चर अभी बाकी है असं म्हणत असताना मी एन्ट्री केल्याशिवाय पिच्चर पूर्ण होणार नाही, असं आव्हानच आठवलेंनी मलिकांना दिलंय. नवाब मलिक यांच्या जावयाला ड्रग्स प्रकरणात अटक केल्यामुळेच मलिक यांनी समीर वानखेडे यांच्याविरोधात मोर्चा वळवल्याचा गंभीर आरोप आठवले यांनी केलाय. समीर वानखेडे यांच्या वडिलांचं नाव ज्ञानदेव वानखेडे आहे. ते मुस्लिम कधीच नव्हते. त्यांनी मुस्लिम महिलेशी लग्न केलं. ते उच्चशिक्षित आहेत. एक्साईज विभागात त्यांनी काम केलं आहे. त्यांनी सर्व कागदपत्र आम्हाला दाखवली आहेत. मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावरील आरोप थांबवावेत, असं आवाहनही रामदास आठवले यांनी केलंय.