Raosaheb Danve | …तितकी फुलं तुम्हाला 4 दिवसात मिळाली, रावसाहेब दानवेंचा भागवत कराडांना मिश्कील टोला

Raosaheb Danve | …तितकी फुलं तुम्हाला 4 दिवसात मिळाली, रावसाहेब दानवेंचा भागवत कराडांना मिश्कील टोला

| Edited By: | Updated on: Aug 22, 2021 | 7:25 PM

जिल्ह्यातील कन्नड शहरामध्ये काल (22 ऑगस्ट) केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत जनआशीर्वाद यात्रेचा समारोप करण्यात आला. यावेळी रावसाहेब दानवे यांनी आपल्या खुमासदार शैलीमध्ये जोरदार भाषण केलं. तसेच नवनिर्वाचित राज्यमंत्री भागवत कराड यांची दानवे यांनी चांगलीच फिरकी घेतली.

औरंगाबाद : जिल्ह्यातील कन्नड शहरामध्ये काल (22 ऑगस्ट) केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत जनआशीर्वाद यात्रेचा समारोप करण्यात आला. यावेळी रावसाहेब दानवे यांनी आपल्या खुमासदार शैलीमध्ये जोरदार भाषण केलं. तसेच नवनिर्वाचित राज्यमंत्री भागवत कराड यांची दानवे यांनी चांगलीच फिरकी घेतली. चाळीस वर्षात मला जेवढी फुले मिळाली नाहीत; तेवढे तुम्हाला चार दिवसात मिळाली, असा टोमना रावसाहेब दानवे यांनी कराड यांना लगावला. दानवे यांनी भागवत कराड यांची अशा खुमासदार शैलीत फिरकी घेतल्यामुळे कालच्या जनआशीर्वाद यात्रेच्या समारोप सभेची एकच चर्चा होत आहे.

Published on: Aug 22, 2021 07:25 PM