Raosaheb Danve | एकीकडे राज्य सरकार वीज विकतं, दुसरीकडे वीज नाही म्हणतं हे चुकीचं, दानवेंची टीका

| Updated on: Oct 31, 2021 | 11:54 AM

गेल्या महिनाभरापासून कोळशाच्या टंचाईने सगळ्यांनाच भेडसावलं आहे. दिवाळसण तोंडावर आलेला असताना प्रकाशाचा म्हणवला जाणारा सण अंधारात जाण्याची भीती व्यक्त केली जात होती.

Follow us on

मुंबई: गेल्या महिनाभरापासून कोळशाच्या टंचाईने सगळ्यांनाच भेडसावलं आहे. दिवाळसण तोंडावर आलेला असताना प्रकाशाचा म्हणवला जाणारा सण अंधारात जाण्याची भीती व्यक्त केली जात होती. मात्र केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी ही शक्यता फेटाळून लावत, दिवाळीत कोणतंही लोडशेडिंग होणार नाही. सगळं नियोजन झालं असल्याचं सांगत राज्यातील जनतेने निश्चित रहावं, असं म्हटलंय. ते आज पुण्यात बोलत होते.
राज्यात वीजटंचाई होणार नाही
दिवाळीच्या तोंडावर राज्यात वीजटंचाई होणार नाही. केंद्र सरकार वेळ पडली तर सेंट्रल ग्रील्डमधून वीज देणार पण राज्यावर अंधाराचं सावट येऊ देणार नाही, असं शब्द रावसाहेब दानवे यांनी दिलाय. यावेळी मात्र त्यांनी आपल्या स्वभावाप्रमाणे राजकीय फटकेबाजी करणं सोडलं नाही.