Ratnagiri : नसतं धाडस आलं न् भाऊ अंगाशी… समुद्रकिनारी हुल्लडबाजी केली अन् कार बुडाली, बघा VIDEO
रत्नागिरीतील अंजरले किनाऱ्यावर एका तरुणाची हुल्लडबाजी अंगलट आली आहे. समुद्रकिनारी गाडी नेण्यास मज्जाव असतानाही नियमांची पायमल्ली करत तरुणाने आपली गाडी वाळूत रुतवली. भरतीची पातळी वाढल्याने अखेर ही गाडी समुद्रात बुडून गेली, ज्यामुळे त्याचे मोठे नुकसान झाले.
रत्नागिरी जिल्ह्याच्या दापोली तालुक्यातील अंजर्ले किनाऱ्यावर एका तरुणाची बेजबाबदार कृती त्याच्या चांगलीच अंगलट आली आहे. समुद्रकिनारी गाडी चालवण्यास स्पष्ट मज्जाव असतानाही या तरुणाने नियमांची पायमल्ली करत आपली गाडी थेट वाळूत उतरवली. मात्र, त्याचा हा नस्ता धाडस त्याच्यासाठी अडचणीचे ठरले. गाडी वाळूत रुतल्याने ती जागून निघू शकली नाही. त्याचवेळी समुद्रातील भरतीचे पाणी वाढू लागले. पाण्याची पातळी वाढत गेल्याने अखेर ही गाडी पूर्णपणे समुद्राच्या पाण्यात बुडून गेली. समुद्रकिनाऱ्यावर नियमांचे उल्लंघन करणे आणि बेफिकीरीने गाडी चालवण्याचे हे दृश्य रत्नागिरीतून समोर आले आहे, जे अशा गैरकृत्यांचे गंभीर परिणाम दर्शवते.
Published on: Nov 06, 2025 05:08 PM
