Dharashiv VIDEO: अय्यो…. हे काय! तुळभवानीच्या अंगा-खांद्यावर उंदरांचा सुळसुळाट, Online दर्शनादरम्यान भाविकाला दिसला उंदिरमामा
तुळजाभवानी मातेच्या गाभाऱ्यात उंदराचा संचार, ऑनलाइन दर्शनादरम्यान दिसून आले उंदीर ... गुजरातमधील भावनगर येथील भाविकाला दिसला उंदीर, उंदरामुळे देवीच्या प्राचीन अलंकारांचा नुकसान होण्याची भीती
धाराशिव येथील तुळजाभवानी मंदिरात उंदरांनी धुमाकूळ घातल्याचा एक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. मंदिर बंद केल्यावर थेट तुळजाभवानी मातेच्या गाभाऱ्यात उंदराचा संचार असल्याचं तुळजाभवानी मातेचे ऑनलाइन दर्शनादरम्यान दिसून येत आहे. गुजरात मधील भावनगर येथील हितेश भाई जानी या भाविकांनी याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. गुजरात मधील भावनगर येथील हितेश भाई जानी यांनी उंदरांना तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. मंदिर बंद केल्यानंतर रात्रभर उंदीर तुळजाभवानी मातेच्या गाभाऱ्यात वावरत असल्याचं ऑनलाइन दर्शनातून स्पष्ट दिसून येत आहे. या उंदरांमुळे तुळजाभवानी मातेच्या प्राचीन अलंकाराचे नुकसान होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. बघा व्हायरल होणारा व्हिडीओ
Published on: Aug 12, 2025 11:47 AM
