चिऊताई चिऊताई दार उघडं, निर्बंधमुक्तीवर रवी गोडसे यांची खोचक प्रतिक्रिया
महाराष्ट्र सरकारनं राज्यातील कोरोना निर्बंध हटवण्याचा निर्णय घेतला. अमेरिकेतील डॉक्टर रवी गोडसे यांनी महाराष्ट्र राज्य सरकारच्या निर्णयाचं स्वागत करताना काही सल्ले देखील दिले आहेत.
महाराष्ट्र सरकारनं राज्यातील कोरोना निर्बंध हटवण्याचा निर्णय घेतला. अमेरिकेतील डॉक्टर रवी गोडसे यांनी महाराष्ट्र राज्य सरकारच्या निर्णयाचं स्वागत करताना काही सल्ले देखील दिले आहेत. चिऊ ताई चिऊ ताई दार उघडं थांब माझ्या बाळाला अंघोळ घालते, थोडासा घोळ घालते.चिऊ ताई चिऊ ताई दार उघडं चिऊ ताई थांब माझ्या बाळाला थीट लाव तुझ्या दुधाला मीठ लावते. शेवटी दार उघडलं याबद्दल शाब्बास, वॅक्सिनेशनच्या कामाला चांगला सपोर्ट केला. चिऊताईंच्या वेगवेगळ्या समित्या आणि कमिट्या आहेत त्यांना माझी एक चिमुकली विनंती आहे की आपली चिमणी बुद्धीपणाला लावून दुसरी काही लफडी करु नका. दार उघडलंय तसेच ते सताड उघडं ठेवा आणि दूर उडून जावा आणि दाणे टिपायला नवीन अंगण घ्यावा, असं रवी गोडसे म्हणाले.
Published on: Mar 31, 2022 08:05 PM
