‘विरोधी पक्षात असाल तर थेट कारवाई…’ वर्धापन दिनाच्या भाषणादरम्यान NCP नेत्याचं मोठं विधान

‘विरोधी पक्षात असाल तर थेट कारवाई…’ वर्धापन दिनाच्या भाषणादरम्यान NCP नेत्याचं मोठं विधान

| Updated on: Jun 10, 2026 | 1:08 PM

आज राष्ट्रवादी पक्षाचा 27 वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. अलीकडेच सुनेत्रा पवार यांनी वर्धापन दिनाबाबत भाष्य केलं. माध्यामांशी बोलताना त्या भावुक झाल्या होत्या. दरम्यान, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटातील नेत्या रोहिणी खडसे यांचं वर्धापन दिनानिमित्त केलेलं भाषण चर्चेत आलं आहे.

आज राष्ट्रवादी पक्षाचा 27 वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. अलीकडेच सुनेत्रा पवार यांनी वर्धापन दिनाबाबत भाष्य केलं. माध्यामांशी बोलताना त्या भावुक झाल्या होत्या. दरम्यान, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटातील नेत्या रोहिणी खडसे यांचं वर्धापन दिनानिमित्त केलेलं भाषण चर्चेत आलं आहे. यावेळी रोहिणी खडसेंनी सत्ताधारी पक्षावर रोख धरला होता.

रोहिणी खडसेंनी वर्धापन दिनाच्या भाषणादरम्यान अनेक विषय अधोरेखित केले. मात्र बोलताना त्या संतप्त झाल्या. यावेळी त्यांनी थेट सरकारवर निशाणा साधत पुण्यातील रेव्ह पार्टीबाबत सांगितले. त्या म्हणाल्या, ‘जेव्हा चार जण घरात काही पार्टी करतात तर ती रेव्ह पार्टी असते अन् जेव्हा 178 जण आंधारलेल्या बंगल्यात पार्टी करतात तर ती हाऊस पार्टी होते. त्या चार जणांवर तातडीने कारवाई होते कारण ते विरोधी पक्षातील आहेत, मात्र 178 जणांना वाऱ्यावर सोडले जाते. त्यामुळे हे लक्षात ठेवा, विरोधी पक्षात असाल तर अनेक कारवायांना सामोरे जावे लागेल. पण तुम्ही डगमगणार नाही याची मला खात्री आहे. आपण सर्वजण आदरणीय शरद पवारांच्या विचारधारेवर चालणारे आहोत. हे विचार आपल्याला तळागाळाशी पोहोचवायचे आहेत.’

Published on: Jun 10, 2026 1:07 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us