रोहित पवारांच्या आंदोलनाकडे शेतकऱ्यांची लढाई म्हणून पहा, कारण… जरांगे पाटलांनी नेमकं काय म्हटलं?
सरकारने शेतकऱ्यांसाठी 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी जाहीर केली आहे. मात्र ज्या शेतकऱ्यांचे कर्ज 2 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे, त्यांनी आधी उर्वरित रक्कम भरल्यानंतरच कर्जमाफीचा लाभ मिळणार असल्याची अट ठेवण्यात आली आहे.
सरकारने शेतकऱ्यांसाठी 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी जाहीर केली आहे. मात्र ज्या शेतकऱ्यांचे कर्ज 2 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे, त्यांनी आधी उर्वरित रक्कम भरल्यानंतरच कर्जमाफीचा लाभ मिळणार असल्याची अट ठेवण्यात आली आहे. ही अट रद्द करून सरसकट 2 लाख रुपयांची कर्जमाफी द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे.
या मागणीसाठी रोहित पवार यांनी पंढरपूरमध्ये अन्नत्याग आंदोलन सुरू केले असून आज आंदोलनाचा तिसरा दिवस आहे. आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी त्यांची तब्येत खालावल्याची माहिती समोर आली आहे. डॉक्टरांनी त्यांचा बीपी आणि शुगर कमी झाल्याचे सांगितले आहे.
दरम्यान, आज मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पंढरपूर येथे रोहित पवार यांची भेट घेतली. “शेतकरी वाचला नाही तर राज्य, देश कसा चालणार?” असा सवाल त्यांनी यावेळी केला. तसेच “या आंदोलनाकडे शेतकऱ्यांची लढाई म्हणून पाहिलं पाहिजे,” असेही ते म्हणाले. सरकार चर्चेसाठी बोलावत असेल तर चर्चेतून मार्ग काढावा, असे मतही मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केले.
