मोठी बातमी! रोहित पवार थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला; बंद दाराआड नेमकी काय झाली चर्चा?

मोठी बातमी! रोहित पवार थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला; बंद दाराआड नेमकी काय झाली चर्चा?

| Updated on: Jul 02, 2026 | 5:07 PM

राज्यातील विविध प्रलंबित प्रश्नांबाबत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करत विविध मागण्यांचे निवेदनही उपमुख्यमंत्र्यांकडे सादर केले.

रोहित पवार यांनी सर्वप्रथम विदीप जाधव यांच्या पत्नीला कायमस्वरूपी शासकीय नोकरी देण्याची मागणी केली. तसेच मृत पिंकी माळी यांच्या भावालाही कायमस्वरूपी नोकरी देऊन कुटुंबाला न्याय मिळावा, अशी विनंती त्यांनी केली.

याशिवाय, एमपीएससी (MPSC) परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्यात यावी, अशी मागणी करत त्यांनी यासंदर्भातील निवेदन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सुपूर्द केले. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून सरकारने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

यावेळी राज्यातील खासगी शाळांतील शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांवरही सविस्तर चर्चा करण्यात आली. शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर तातडीने निर्णय घेऊन त्यांना न्याय द्यावा, अशी मागणी रोहित पवार यांनी केली.

या भेटीदरम्यान सामाजिक, शैक्षणिक आणि रोजगाराशी संबंधित विविध प्रश्नांवर सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती समोर आली असून, आता या मागण्यांबाबत राज्य सरकार काय निर्णय घेते, याकडे संबंधित घटकांचे लक्ष लागले आहे.

Published on: Jul 02, 2026 5:07 PM
Follow Us