Vaibhav Solankar | रोहित पवारांशी संबंधित साखर कारखान्याच्या प्रदूषणामुळे विमान अपघात?
आमदार रोहित पवार सातत्याने सांगत आहेत की अजित पवारांचा विमान अपघात नैसर्गिक अपघात नाही, तर यामागे काही घातपात असण्याची शक्यता आहे. त्यांनी चार पत्रकार परिषदांमध्ये यावर चर्चा करून तपास यंत्रणांना प्रश्न विचारले आहेत. दरम्यान, आता रोहित पवार यांच्याविरोधातही आरोप येत आहेत. भाजप युवा मोर्चाने त्यांच्या साखर कारखान्याशी संबंधित गंभीर आरोप केले आहेत. कारखान्यातून निघणाऱ्या धुरामुळे बारामती परिसरातील दृश्य कमी झाल्याने हा अपघात झाला असण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
आमदार रोहित पवार सातत्याने सांगत आहेत की अजित पवारांचा विमान अपघात नैसर्गिक अपघात नाही, तर यामागे काही घातपात असण्याची शक्यता आहे. त्यांनी चार पत्रकार परिषदांमध्ये यावर चर्चा करून तपास यंत्रणांना प्रश्न विचारले आहेत. त्यांनी अनेक पुरावे आणि यंत्रणांचे दावे खोडून काढणारे प्रेझेंटेशन देखील केले आहे. रोहित पवार यांनी डीजीसीए आणि इतर यंत्रणांविरोधात या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, आता रोहित पवार यांच्याविरोधातही आरोप येत आहेत. भाजप युवा मोर्चाने त्यांच्या साखर कारखान्याशी संबंधित गंभीर आरोप केले आहेत. कारखान्यातून निघणाऱ्या धुरामुळे बारामती परिसरातील दृश्य कमी झाल्याने हा अपघात झाला असण्याची शक्यता व्यक्त केली आहे. भाजप युवा मोर्चाचे पुणे जिल्हाध्यक्ष वैभव सोलनकर यांनी यावर तांत्रिक चौकशी करण्याची मागणी केली आहे. याबाबत भाजप युवा मोर्चाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले असून, शेठफळ गडे येथील साखर कारखान्यामुळे प्रदूषण होत असल्याचा आरोप करून रोहित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.
