Ahmednagar | अहमदनगरमध्ये देशातील सर्वात मोठ्या भगव्या ध्वजाची प्रतिष्ठापना

Ahmednagar | अहमदनगरमध्ये देशातील सर्वात मोठ्या भगव्या ध्वजाची प्रतिष्ठापना

| Edited By: | Updated on: Oct 15, 2021 | 11:33 AM

दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर ध्वजाची प्रतिष्ठापना करण्यात येणार असून हा झेंडा कोणा एकाचा नसून सर्वांचा, यावर कोणा एकाची मक्तेदारी नाही, असा टोला रोहित पवारांनी लगावला

अहमदनगरला आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून  कर्जत येथील ऐतिहासिक खर्ड्याच्या भुईकोट शिवपट्टण किल्ल्यात देशातील सर्वात मोठ्या भगवा ध्वजाची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर ध्वजाची प्रतिष्ठापना करण्यात येणार असून हा झेंडा कोणा एकाचा नसून सर्वांचा, यावर कोणा एकाची मक्तेदारी नाही, असा टोला रोहित पवारांनी लगावला. सर्वांना एकतेचा संदेश द्यायचाय असल्याचं देखील रोहित पवारांनी म्हटलंय. या झेंड्याखाली सर्व एकत्र येणार असून याच्या पुढे कोणी लहान मोठा नाही असं मत त्यांनी व्यक्त केलाय. हा 74 मीटर उंचीचा भव्य-दिव्य असा भगवा स्वराज्य ध्वज फडकवण्यात येणार आहेय. तर या ध्वजाचा आकार 96X64 फूट असून वजन 90 किलो आहे. तसेच देशातील 74 इतिहास आणि धार्मिक ठिकाणी या ध्वजाचे पूजन झाले असून 36 जिल्हे आणि 6 राज्यांमधून 12 हजार किलोमीटर असा सलग 37 दिवस या ध्वजाचा प्रवास करून आज खर्डा येथे प्रतिष्ठापना त्याची प्रतिष्ठापना होणार आहे.